Ad will apear here
Next
शिरीष पै, सुहास शिरवळकर
केवळ तीन ओळींमध्ये आशय आणि भावना मांडण्याचा ‘हायकू’ हा काव्यप्रकार मराठीत रुजवणाऱ्या शिरीष पै, ‘दुनियादारी’ या जबरदस्त कादंबरीने अवघ्या तरुणाईला भुरळ पाडणारे सुहास शिरवळकर आणि समाजभूषण चरित्रकार पुरुषोत्तम पांडुरंग गोखले यांचा १५ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
..... 
शिरीष व्यंकटेश पै
१५ नोव्हेंबर १९२९ रोजी जन्मलेल्या शिरीष पै कवयित्री, लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. आपले वडील आचार्य अत्रे यांच्याकडून साहित्याचा वारसा लाभल्याचं त्यांनी नवव्या वर्षीच लेखन सुरू करून सिद्ध केलं होतं. 

वरकरणी दिसायला अत्यंत सोपा, पण केवळ तीन ओळींतून खोल आशय मांडू पाहण्याचा जपानी कवितेचा प्रकार ‘हायकू’ त्यांनीच सर्वप्रथम मराठीत आणला. जपानमध्ये जवळजवळ पाचशे वर्षांची परंपरा असणारा हा काव्यप्रकार जपानमध्ये १७व्या शतकात ‘बाशो’ या कवीने रुजवला होता. त्यातली खुमारी टिकवत शिरीष पै यांनी त्यांचे मराठीत अनुवादही केले आणि स्वतः स्वतंत्रपणे अनेक हायकू रचले. त्यांनी अनेक तरल, हळुवार प्रेमकविता रचल्या आहेत. 

त्यांनी वडिलांच्या ‘मराठा’, ‘नवयुग’मध्ये पत्रकारिता केली होती आणि पुढे ‘मराठा’च्या संपादक म्हणूनही काम पाहिलं होतं. त्यांना केशवसुत पारितोषिक, तसंच महाराष्ट्र राज्य सरकारचे आणि साहित्य परिषदेचे पुरस्कार मिळाले होते.

अंतर्यामी, अनुभवान्ती, अज्ञात रेषा, आईची गाणी, आकाशगंगा, आजचा दिवस, आठवणीतले अत्रे, आव्हान, ऋतुचक्र, एकतारी, कस्तुरी, काळी एकदा फुलली होती, कांचनबहार, चैत्रपालवी, जीवनगाथा, जुनून, माझे हायकू, फक्त हायकू, पुन्हा हायकू, रानातले दिवस, लालन बैरागीण, वडिलांच्या सेवेसी, हेही दिवस जातील, अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

दोन सप्टेंबर २०१७ रोजी त्यांचं निधन झालं. 

(शिरीष पै यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा. ‘वडिलांच्या सेवेसी’ या पुस्तकात शिरीष पै यांनी आई, वडील आणि पती यांच्याबद्दलच्या काही आठवणी लिहिल्या आहेत. त्या पुस्तकाच्या मनोगतात त्यांनी मांडलेली आत्मचरित्राबद्दलची स्वतःची भूमिका वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
.................

सुहास शिरवळकर

१५ नोव्हेंबर १९४८ रोजी जन्मलेले सुहास शिरवळकर हे ‘सुशि’ या आपल्या नावाच्या आद्याक्षरांनी प्रसिद्ध असलेले तुफान लोकप्रिय कादंबरीकार आणि रहस्यकथाकार!

ऐंशीच्या दशकामधल्या युवा पिढीला त्यांच्या कादंबऱ्यांनी चांगलीच भुरळ घातली होती. त्यांनी तब्बल ९६ पुस्तकं लिहिली आणि काही कविताही लिहिल्या होत्या.

‘दुनियादारी’ ही त्यांची सर्वांत लोकप्रिय आणि गाजलेली कादंबरी. यावर टीव्ही सीरियल आली होती आणि मराठी सिनेमाही आला होता. 

अंतिम, अनुभव, असह्य, अवाढव्य, बलाढ्य, बंदिस्त, बरसात चांदण्यांची, भयानक, ब्लॅक कोब्रा, दास्तान, डेडशॉट, इलेव्हंथ अवर, गाफील, गिधाड, गोल्ड हेवन, गुणगुण, हव्यास, हिरवी नजर, कळप, काळे युग, कल्पांत सुशि, मर्डर हाउस, निदान, पहाडी, पहाटवारा, सहज, पोलादी, अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

११ जुलै २००३ रोजी त्यांचं निधन झालं.

(सुहास शिरवळकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा.)
...............

पुरुषोत्तम पांडुरंग गोखले

१५ नोव्हेंबर १८९९ रोजी जन्मलेले पुरुषोत्तम पांडुरंग तथा बाबुराव गोखले हे प्रसिद्ध चरित्रकार होते. त्यांना ‘समाजभूषण’या उपाधीने ओळखलं जाई. समर्थ रामदास आणि स्वामी विवेकानंद यांवर त्यांचा विशेष अभ्यास होता. १९४८ साली साताऱ्यामध्ये भरलेल्या पत्रकार परिषदेचे ते अध्यक्ष होते. 

त्यांची एकूण ४२ पुस्तकं प्रसिद्ध झाली आणि गोपाळ गणेश आगरकर, वेदव्यास पंडित सातवळेकर, समर्थांचा संप्रदाय, भारतभाव, अशी काही पुस्तकं विशेष गाजली. १९८६ साली त्यांचं निधन झालं. 

.............








(शिरीष पै यांच्या कारकिर्दीचा धावता आढावा घेणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZSWBI
Similar Posts
जॉर्ज कॉफ्मन दोन महायुद्धांच्या काळातल्या ब्रॉडवेवरच्या सर्वांत लोकप्रिय आणि हिट नाटकांचा लेखक-दिग्दर्शक असलेला आणि सहकाऱ्यांच्या साथीने लिहिलेल्या तब्बल ४५ नाटकांपैकी बहुतेक सर्वच कमालीची यशस्वी ठरण्याचे भाग्य लाभलेला अमेरिकेचा तुफान लोकप्रिय नाटककार जॉर्ज कॉफ्मनचा १६ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याच्याविषयी
आनंद अंतरकर आपले वडील अनंत अंतरकर यांच्या पश्चात ‘हंस’सारख्या मासिकाच्या संपादनाची धुरा यशस्वीपणे वाहणाऱ्या आणि स्वतः उत्तम लेखन करणाऱ्या आनंद अंतरकर यांचा १८ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय....
रत्नाकर मतकरी खेकडा, कळकीचे बाळ यांसारख्या एकाहून एक उच्च दर्जाच्या गूढकथा लिहिणारे आणि लोककथा ७८, प्रेमकहाणी, आरण्यक, चार दिवस प्रेमाचे यांसारखी सरस प्रयोगशील नाटकं लिहिणारे रत्नाकर मतकरी यांचा १७ नोव्हेंबर हा जन्मदिवस. त्या निमित्ताने आज ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
मंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर ज्येष्ठ समीक्षक आणि खुसखुशीत लेखांसाठी प्रसिद्ध असणारे मं. वि. राजाध्यक्ष आणि बालसाहित्यकार सुमती पायगावकर यांचा सात जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language